वाडा येथे शेतक-याची कर्जामुळे आत्महत्या
By Admin | Published: December 18, 2014 05:31 AM2014-12-18T05:31:14+5:302014-12-18T05:31:14+5:30
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वाड्यात पोहोचले आहे. तालुक्यातील गातेस खुर्द या गावातील
वाडा : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण वाड्यात पोहोचले आहे. तालुक्यातील गातेस खुर्द या गावातील शेतकऱ्याने बुधवारी (दि़ १७) सकाळी कर्जाच्या ओझ्यामुळे आपले जीवन संपविले़ रमेश अनंता पष्टे (४५) असे त्यांचे नाव आहे. शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
गातेस खुर्द या परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या सोमवारी (दि. १५) वाडा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन भातशेती, खरीप-रब्बी पिके व भाजीपाला या पिकांची नुकसानभरपाई द्यावी, अशी
मागणी केली होती. त्यावर पष्टे यांनीही सही केली होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. (वार्ताहर)