नाशिकमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: June 27, 2016 06:17 PM2016-06-27T18:17:50+5:302016-06-27T18:17:50+5:30
सटाणा तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे नामपूर -ताहाराबाद रस्त्यावरील पुलाखाली काळगांव ता साक्री येथील शेतकरी भाऊसाहेब फकिरा ठाकरे (५५) यांनी सोमवारी सकाळी विष प्राशन करून
ऑनलाइन लोकमत
द्याने, दि.२७ - सटाणा तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे नामपूर -ताहाराबाद रस्त्यावरील पुलाखाली काळगांव ता साक्री येथील शेतकरी भाऊसाहेब फकिरा ठाकरे (५५) यांनी सोमवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नामपूर ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ सुमित भामरे यांनी मृत घोषित केले . भाऊसाहेब ठाकरे यांची एक एकर ८० आर जमीन असून गेल्या दोन वर्षापासून असलेली दुष्काळी परिस्थिती हातऊसनवार घेतलेले पैसे बँकेचे व दूधसंघाचे सोसायटीचे एकूण तीन लाख रु पयांचे कर्ज होते. बियाणे घेण्यासाठी नामपूर येथे जात आहे सांगून घरातून सकाळी निघाले होते . बियाणे घेण्यासाठी पैसे नसल्याने या विवंचनेत त्यांनी जीवनयाञा संपवली. नामपूर ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी पंचनामा केला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. शोकाकूल वातावरणात काळगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.