राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ‘अन्नसुरक्षा’
By admin | Published: August 6, 2015 01:02 AM2015-08-06T01:02:39+5:302015-08-06T01:02:39+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील २२ लाख शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेची
मुंबई : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील २२ लाख शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्तीही तिथे वाढविण्यात आली आहे. काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले.
पावसाची स्थिती, पीक परिस्थिती, पाणीसाठा याचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ज्या जिल्ह्यात जीवनदायी योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी असेल ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊन धान्यसाठा पुरेसा राहील याची दक्षता घेण्यात यावी. पाणी, चाऱ्याची टंचाई भेडसावू नये म्हणून वैरण विकास कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.१४ जिल्ह्यांमध्ये २२ लाख शेतकऱ्यांना २ रुपये किलोने गहू आणि ३ रुपये किलोने तांदूळ मिळणार
राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अटी शिथिल.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलणार.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र महासंचालनालय. (विशेष प्रतिनिधी)