शेतकरी संप - उच्चस्तरीय मंत्रिगट करणार शेतकरी नेत्यांशी चर्चा

By admin | Published: June 9, 2017 06:54 PM2017-06-09T18:54:34+5:302017-06-09T18:54:34+5:30

शेतकऱ्यांच्या भावनांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय..

Farmer's affair - Discuss with senior leaders of high-level ministers | शेतकरी संप - उच्चस्तरीय मंत्रिगट करणार शेतकरी नेत्यांशी चर्चा

शेतकरी संप - उच्चस्तरीय मंत्रिगट करणार शेतकरी नेत्यांशी चर्चा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - काही दिवसांपासून राज्यात कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या भावनांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली असून हा गट राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांशी पाठीशी राहील. शेतकरी संकटात आहे, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिगटात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष महाजन आणि शिवसेनेचे दिवाकर रावते (परिवहनमंत्री) यांचा समावेश आहे. हा गट राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी सर्व मागण्या, सूचना यावर चर्चा करेल. आणि त्यांचा अहवाल सादर करेल. कोणताही प्रश्न संवादानेच सुटू शकतो, असा आपला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Farmer's affair - Discuss with senior leaders of high-level ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.