भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक; बाजार समितीत दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 01:37 PM2021-05-28T13:37:49+5:302021-05-28T13:38:47+5:30

Khamgaon Apmc News : भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक झाले.

Farmers aggressive in Khamgaon due to fall in groundnut prices; Stone throwing in the market committee | भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक; बाजार समितीत दगडफेक

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक; बाजार समितीत दगडफेक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी, शुक्रवारी बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले. भुईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी झालेल्या तुरळक दगडफेकीत दोन शेतकºयांसह एक पोलिस जखमी झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच कृउबासमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले.
 बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. दरम्यान, वाढत्या आवकीमुळे शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले. केवळ ३२०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी विघ्नंसंतोषी लोकांनी शेतकºयांच्या जमावाच्या दिशेने दगड भिरकावले. प्रतिउत्तरात शेतकºयांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलीसासह उंद्री येथील एक शेतकरी जखमी झाला. दसरकर यांच्या हातावर दगड लागला. तर शेतकºयाच्या डोक्यात दगड लागल्याने त्याचे डोके फुटले. त्याचप्रमाणे कृउबास समोर नास्त्याच्या हॉटेलमधील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.


एसडीपीओं कोळी ही घटनास्थळी दाखल
-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाल्याचे समजताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसडीपीओ अमोल कोळी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनी शेतकºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला.


बाजार समितीत धावपळ!
तुरळक दगडफेक आणि शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी बाजार समितीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एका पाठोपाठ एक अशा तीन गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकºयांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. पोलिस कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून काढता पाय घेतला.

 

Web Title: Farmers aggressive in Khamgaon due to fall in groundnut prices; Stone throwing in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.