‘समृद्धी’च्या शेतजमीन मूल्यांकनासाठी लाच मागितल्याने शेतकऱ्याचे विषप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:56 AM2018-05-13T04:56:22+5:302018-05-13T04:56:22+5:30
समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या शेतजमिनीच्या मूल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेले किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे
दुसरबीड (जि. बुलडाणा) : समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या शेतजमिनीच्या मूल्यांकनासाठी कृषी अधिकारी लाच मागत असल्याने त्रस्त झालेले किनगाव राजा येथील शेतकरी नंदकिशोर मांटे (४७) यांनी शुक्रवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कृषी अधिकाºयांनी मूल्यांकनासाठी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप नंदकिशोर यांचे बंधू पंजाबराव मांटे यांनी केला आहे.
मांटे कुटुंबाची पाच एकर शेतजमीन आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग त्यांच्या शेतातून जातो. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून जमीन अधिग्रहण व त्यातील बाबींसाठी नंदकिशोर मांटे यांनी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा केला. मात्र शेतातील आंब्यांच्या बागेचे मूल्यांकनच न केल्याचा मांटे कुटुंबियांचा आरोप आहे. वडिलोपार्जीत शेतात पूर्वी मोसंबीची बाग होती; मात्र मध्यंतरीच्या दुष्काळामुळे ती बाग मोडून आंब्यांची झाडे लावण्यात आली.
जिल्हाधिकाºयांच्या पत्रानंतरही मूल्यांकन, अधिग्रहण व मोबदल्याची प्रक्रिया पार पडली नाही. त्यातच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लाचेची मागणी केल्याचे मांटे यांचे म्हणणे आहे. तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क होऊ शकला नाही.
स्थानिक आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही यंत्रणेला पत्र दिले होते. त्यावर जिल्हाधिकाºयांनी ३ एप्रिलला उपविभागीय अधिकाºयांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणात कृषी विभागाने सर्व बाबी तपासून नियमानुसार तत्काळ मूल्यांकन करावे व महसूल उप-विभागाचे मूल्यांकनाचे प्रस्ताव तत्काळ जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीकडे पाठवावेत, असे स्पष्ट केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.
नंदकिशोर मांटे हे विषप्राशन करून किनगाव राजा पोलीस ठाण्यात आले होते. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचे योग्य मूल्यांकन होत नाही. त्यासाठी अधिकारी त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. अजून तक्रार दाखल नाही.
- जे. बी. शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक, किनगाव राजासंबंधित शेतकºयाकडून चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करण्याची गळ घातली जात होती. यासंदर्भात ८ मे रोजी ते भेटले होते. तेव्हा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयालाही संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. अनुषंगिक कागदपत्रेही उपलब्ध आहेत.
- प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा