कवडीमोल भावाने माल विकण्यास शेतकरी विवश

By admin | Published: July 25, 2015 01:51 AM2015-07-25T01:51:19+5:302015-07-25T01:51:19+5:30

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र

Farmers are constrained to sell their goods in Kawimimol | कवडीमोल भावाने माल विकण्यास शेतकरी विवश

कवडीमोल भावाने माल विकण्यास शेतकरी विवश

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीशिवाय बाजारात कमी दराने होणाऱ्या मालाच्या विक्रीलाही बळी पडावे लागते, या मुद्याकडे दुर्लक्ष होते.
राज्य सरकारे राज्य आपत्ती निवारण निधीमधून (एसडीआरएफ) पात्र/अधिसूचित नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत आवश्यक मदत उपाययोजना सुरू करतात. राज्य सरकारांकडून मदत अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यमान मापदंड आणि प्रक्रियेनुसार ‘एनडीआरएफ’मधून अतिरिक्त सहाय्यता देण्याबाबत विचार करण्यात येतो, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंडारियांनी शुक्रवारी खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
गहू, ज्वारी, काबुली चणा यासारखी पिके आणि सोबतच आंबा, डाळिंब आणि द्राक्षांच्या बागा नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात आली, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.
केंद्रीय पथकाची शिफारस
२०१४ च्या खरीप हंगामादरम्यान महाराष्ट्र सरकारने राज्यात २६ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आणि ‘एनडीआरएफ’कडून केंद्रीय साहाय्य देण्याची मागणी करीत अर्ज सादर केला. केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’कडून १,९६२.९९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. असे कुंडारिया म्हणाले.

Web Title: Farmers are constrained to sell their goods in Kawimimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.