शेतकरी करताहेत "ई पोर्टलवर' खरेदी

By Admin | Published: October 11, 2016 05:14 PM2016-10-11T17:14:27+5:302016-10-11T17:14:27+5:30

जागतिक बाजारपेठ आता 'ई पोर्टलवर' भरत असून, ग्राहकांकडून त्याचे जोरदार स्वागत होत आहे. एका क्लिकवर कोणत्याही वस्तूंची घरबसल्या खरेदी करता

The farmers are purchasing "e-portal" | शेतकरी करताहेत "ई पोर्टलवर' खरेदी

शेतकरी करताहेत "ई पोर्टलवर' खरेदी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 11 -  जागतिक बाजारपेठ आता 'ई पोर्टलवर' भरत असून, ग्राहकांकडून त्याचे जोरदार स्वागत होत आहे. एका क्लिकवर कोणत्याही वस्तूंची घरबसल्या खरेदी करता येत असल्याने ग्राहकांना बाजारात जाण्याची गरज संपली आहे. यात आता शेतकरी देखील मागे राहिला नाही. गेल्या सात महिन्यात शेतकऱ्यांनी ६६ लाख रुपयांच्या एक लाखांहून अधिक वस्तूंची खरेदी या 'ई मंडईतून' केली आहे.
मोबाईल, पादत्राने, विविध इलेक्ट्रॉॅनिक वस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने, पुस्तके इथपासून ते भाजी देखील आता घरबसल्या खरेदी करता येऊ शकते. विविध बहुराष्ट्रीय कंपन्या देखील या व्यावसायात पडल्या आहेत. या ई कॉमर्समधील मॉलमध्ये शेतमाल असला तरी शेतमाल उत्पादनासाठी आवश्यक साधनांची मात्र कमतरता होती. स्टार्ट अप अंतर्गत सुरु झालेल्या अ‍ॅग्रो स्टार या कंपनीने ही उणीव भरुन काढली आहे. त्या अंतर्गत विविध प्रकारची बियाणे, खते, लहानसहान कृषी यंत्रे, ताडपत्री, खते फवारणी यंत्र असे साहित्य एका फोनवर उपलब्ध होत आहे.
त्यासाठी कंपनीचे संकेतस्थळ अथवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांनी फोन केल्यास हवे असलेल्या कृषी पुरक साधनांची मागणी नोंदविली जाते. त्याचा पुरवठा मागणी नोंदविल्यानंतर सहा दिवसांच्या आत केला जातोे. शेतकऱ्यांना देखील तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन लहानसहान खरेदीसाठी पैसा व वेळ घालविण्याची गरज उरली नसल्याने त्यांच्याकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मार्च २०१६ मध्ये या सेवेच्या माध्यमातून २ लाख ५५ हजार ५८९ रुपयांच्या १ हजार ३६५ वस्तू या शेतकऱ्यांनी मागविल्या होत्या. त्यात सप्टेंबर अखेरीस १० हजार ७४६ वस्तूंपर्यंत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी तब्बल १७ लाख ५६ हजार १५ वस्तूंची खरेदी शेतकऱ्यांनी या माध्यमातून केली आहे. ग्रामीण भागात दूरवर जाळे असलेल्या टपाल विभागाच्या माध्यमातून या वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.

महिना पुरविलेल्या वस्तूंची संख्या किंमत
मार्च २०१६१,३६५ २,५५,५८९
एप्रिल २,२४८ ३,२२,३९८
मे ४,९६५ ६,६३,०५२
जून ७,६९८ १०,५०,०१९
जुलै ८,५४८ १३,२७,३४७
आॅगस्ट८,५५२ १२,७५,७०२
सप्टेंबर१०,७४६ १७,५६,०१५
एकूण १,०४,१२२ ६६,५०,१२२

टपाल विभागाने माहिती, विविध वस्तू व शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाची सुविधा देण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. त्याचा फायदा घेत एका कंपनीने कृषी साधने पुरविण्यासाठी टपाल विभागाची सेवा घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन छोट्या-मोठ्या वस्तू खरेदी करण्याची गरज संपली आहे. उत्पादक ते थेट शेतकरी असा वस्तूंचा पुरवठा होत असल्याने अल्पदरात या वस्तू मिळत आहेत.

- गणेश सावळेश्वरकर, पोस्टमास्टर जनरल पुणे विभाग

Web Title: The farmers are purchasing "e-portal"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.