‘शेतकऱ्यांनो घ्या, पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ’
By admin | Published: July 21, 2016 03:17 AM2016-07-21T03:17:33+5:302016-07-21T03:17:33+5:30
खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांची नैसर्गिक आपत्तीतून मुक्तता व्हावी.
विक्रमगड : खरीप हंगामात तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांची नैसर्गिक आपत्तीतून मुक्तता व्हावी. दरवर्षी कीड व रोगांपासून होणाऱ्या नुकसानी नंतरही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकू न रहावे यासाठी राज्य शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु केली आहे. तो घेणाऱ्या शेतकऱ्याच्या भात, नाचणी, तूर, उडीद, भुईमूग, तीळ, या पिकांना शासनाकडून विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ज्या पिकाचा विमा उतरणार आहेत त्याच्या हप्त्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरणा करावा. पंतप्रधान पीक विमा योजनेचे संरक्षण पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत देण्यात येईल. या दरम्यान, काही नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल. (वार्ताहर)
>गारपीट, वादळ, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती, वीज पडणे, पावसात खंड पडणे, पूर, कीड, रोग, अशा आपत्ती आल्यास पंचनामा करून राज्य शासनाकडून भरपाई दिली जाईल.
विक्रमगड तालुक्यातील लोकांचा शेती हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून आपत्काळात शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कृषी विभागाकडून पंतप्रधान पिक विमा योजना शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे