शेतकरी संप : सरकारी कार्यालयांना टाळेठोक आंदोलन
By admin | Published: June 6, 2017 12:51 PM2017-06-06T12:51:24+5:302017-06-06T13:18:08+5:30
आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.
(शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा)
राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतक-यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या शेतक-यानं आत्महत्या केली आहे, त्यानंही ""महाराष्ट्र बंद""मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.
नवनाथ चांगदेव भालेराव असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव असून ते 30 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे. येवला लासलगाव रोडवरील पिंपरी फाटा येथे सोमवारी पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनात नवनाथ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.