शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच
By admin | Published: June 12, 2017 02:22 AM2017-06-12T02:22:23+5:302017-06-12T02:22:23+5:30
कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून राज्यभरात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात वडवणी शहरातील विशाल वसंत शिंदे (३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड/ सांगली/ नाशिक/ अकोला : कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून राज्यभरात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
बीड जिल्ह्यात वडवणी शहरातील विशाल वसंत शिंदे (३३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सांगली जिल्ह्यातील तुंग (ता. मिरज) येथील अल्लाबक्ष हनीफ सुतार (५७) या शेतकऱ्याने रविवारी सायंकाळी विषाप्राशन करून आत्महत्या केली.
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील अमीर लतीफ चौधरी (५५) या शेतकऱ्याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या अकोला जिल्ह्यातील जयप्रकाश उद्धवराव खारोडे या युवा अल्पभूधारक शेतकऱ्याने रविवारी विषप्राशन करून आत्महत्या केली़ दिव्यांग असलेल्या जयप्रकाशच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.