शेतकरी संप : सर्व मागण्या मान्य न झाल्याने शिवसैनिकांचा रास्तारोको

By admin | Published: June 3, 2017 01:04 PM2017-06-03T13:04:29+5:302017-06-03T13:45:33+5:30

शनिवारी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तिस:या दिवशी सकाळी शुकशुकाट

Farmer's Contact: Because of not being accepted by all demands, Shivsainik's Rastaroko | शेतकरी संप : सर्व मागण्या मान्य न झाल्याने शिवसैनिकांचा रास्तारोको

शेतकरी संप : सर्व मागण्या मान्य न झाल्याने शिवसैनिकांचा रास्तारोको

Next

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 3 - प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शेतक-यांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्याने शेतकरी संप मिटला आहे. संप मागे घेण्यात आला असला तरीही शनिवारी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी शुकशुकाटच होता.  बाजार समितीत शनिवारी मक्याची 40 पोतेच आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरख पाटील यांनी दिली़.

तर दुसरीकडे, शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यानं शिवसैनिकांनी चाळीसगावरोड चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करत येथील परिसर दणाणून सोडला.

धुळे बाजार समितीत मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर येत. एरव्ही 700 ते 800 पोते येणारा मका आता या संपामुळे दुस-या दिवशी 30 पोते तर तिस-या दिवशी 40 पोते मालाची आवक होती़. परिणामी अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत होणारी आर्थिक उलाढाल केवळ 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत आली आहे. साहजिकच याचा फटका बाजार समितीला सोसावा लागत आहे.

शेतमालाला रास्त भाव मिळावा, शेतक-यांची संपूर्ण कजर्माफी व्हावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 1 जूनपासून शेतक-यांच्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली. परिणामी संपाला जिल्ह्यातून प्रतिसाद लाभत आहे.

धुळे, साक्री दोंडाईचा येथील बाजार समितींसह  पिंपळनेर उपबाजार समितीच्या आवारात शेतकरी फिरकलेच नाही़. शेतक-यांनी भाजीपाल्यासह कांदे आणि दूध रस्त्यावर फेकत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. तर बाजार समितीत हमाल केवळ हमालांची हजेरी आहे. 


गुजरातकडे जाणारे ट्रक शेतक-यांनी रोखले
साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून गुजरात राज्याकडे जाणारे दूधाचे व भाजीपाल्याचे टँकर शेतक-यांनी संघटनांच्या प्रतिनिधींनी रोखून धरले होते. परंतु, शेतक-यांच्या 70 टक्के मागण्या शासनाने पूर्ण केल्यामुळे गुजरात राज्याकडे जाणा-या टँकर सोडण्यात आल्याची माहिती महेश मराठे यांनी दिली आहे.


शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन

दरम्यान, शासनाने शेतक-यांच्या सर्व मागण्या पूर्ण न केल्यामुळे शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेतर्फे शनिवारी दुपारी 12 वाजता चाळीसगाव रोड चौफुलीवर ‘रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Farmer's Contact: Because of not being accepted by all demands, Shivsainik's Rastaroko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.