कर्जमाफीची लाइन ‘आॅफ’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:43 AM2017-07-27T03:43:10+5:302017-07-27T03:43:13+5:30
राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असणाºया शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले खरे, पण हे संकेतस्थळ गेले तीन दिवस ‘आॅफ’च राहिल्याने, शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असणाºया शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले खरे, पण हे संकेतस्थळ गेले तीन दिवस ‘आॅफ’च राहिल्याने, शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकºयांसह विकास संस्था, जिल्हा बॅँकेच्या पातळीवर गोंधळ उडाला आहे.
विकास संस्था व जिल्हा बॅँकेच्या पातळीवर कर्जमाफीच्या याद्यांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी थेट आॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज मागविले आहेत. सोमवार (दि. २४) पासून ही प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अद्याप संबंधित यंत्रणा सक्षमपणे काम करीत नाही. महा-ई सेवा केंद्रे, जिल्हा बॅँकेच्या शाखा, निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून हे अर्ज मागविले आहेत. जिल्हा बॅँकेने निरीक्षकांच्या माध्यमातून छापील अर्ज विकास संस्थांना दिले आहेत. संस्थांनी पात्र शेतकºयांकडून माहिती घेऊन, त्याप्रमाणे शेतकºयांच्या समक्ष ती पुन्हा आॅनलाइन भरायची आहे. गेले दोन दिवस संबंधित संकेतस्थळावरून अर्ज भरताच येत नव्हता. बुधवारी सकाळपासून किमान शेतकºयांच्या नावांचे रजिस्ट्रेशन होऊ लागले आहे. रजिस्ट्रेशन झाले, पण मूळ फॉर्मच ओपन होत नसल्याने माहिती भरायची कशी, असा पेच विकास संस्था व बॅँकांच्या यंत्रणेसमोर आहे. ही यंत्रणा कधी सक्षमपणे सुरू होईल, याबाबत सहकार विभागही अनभिज्ञ असल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़