शेतकऱ्यांचा संयम सुटला: विमा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोंडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 07:00 PM2019-11-15T19:00:09+5:302019-11-15T19:11:34+5:30
संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सायंकाळपर्यंत कोंडून ठेवले.
अकोला: अवकाळी पावसामुळे अकोट, तेल्हारा तालुक्यातील केळीचे पिक भुईसपाट झाले. केळी उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पणज, बोचरा येथील शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी काढलेला विमा देण्यास दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी टाळाटाळ करीत असल्याने, संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सायंकाळपर्यंत कोंडून ठेवले.
अकोट तालुक्यातील पणज, बोचरा येथील शेकडो शेतकऱ्यांनी दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये हेक्टरी ८ हजार ८00 रूपये भरून केळी पिकाचा विमा काढला होता. दरम्यान वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळीचे पिक भुईसपाट झाले. त्यामुळे या गावांमधील शेतकºयांनी विमा कंपनीकडे नुकसानभरपाईची देण्याची मागणी केली. परंतु कंपनीचे अधिकारी, कर्मचारी विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३0-३५ शेतकºयांनी दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली आणि पिक विम्याविषयी जाब विचारला. परंतु अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने, संतप्त शेतकºयांनी अधिकारी, कर्मचाºयांना घेराव घातला आणि त्यांना कार्यालयात कोंडले. अधिकारी, कर्मचाºयांना कोंडल्यावर अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आणि दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अहमदनगर, पुणे विभागीय कार्यालयात संपर्क साधला आणि शेतकºयांचा विमा प्रलंबित असल्याची माहिती शेतकºयांना दिली. लवकरच विम्याची रक्कम खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्यावर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले.