शेतकऱ्यांनो...१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 10:52 AM2022-06-16T10:52:07+5:302022-06-16T10:52:47+5:30

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे.

Farmers do not sowing till 15th July Maharashtra is worried water supply is declining rapidly | शेतकऱ्यांनो...१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

शेतकऱ्यांनो...१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

Next

विशाल सोनटक्के 

यवतमाळ :

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे.  ऐन पावसाळ्यात राज्यातील ५९१ गावे आणि १३१२ वाड्यांची ५०१ टँकरद्वारे तहान भागविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार खरिपासाठी यंदा राज्यात १४६.८५ लाख हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित आहे. पाऊस आणखी लांबणीवर पडल्यास हे नियोजन बिघडेल. त्यामुळे १५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.

तारीख - १४ जूनपर्यंत.
- अपेक्षित पाऊस - सरासरी ९६.०९ मिमी
- झाला किती - सरासरी ३४.०९ मिमी
- म्हणजेच - अपेक्षित सरासरीच्या ३६ टक्के
- गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत - १२४ टक्के

कोणत्या विभागात किती पाऊस? 
(१४ जूनपर्यंत)
कोकण - २४.०३ टक्के
नाशिक - ५०.०५ टक्के
पुणे - ३७.०८ टक्के
औरंगाबाद - ६९.०४ टक्के
अमरावती - ३२.०४ टक्के
नागपूर - ११.०९ टक्के

पाणीटंचाईच्या झळा
५९१ गावे ।  १३१२ वाड्या
५०१ टँकर  । गेल्या वर्षी - ४८७ टँकर 

पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
एकूण प्रकल्प- ३,२६७
उपलब्ध साठा - २३.१६%
(१४ जून रोजी)

खरीप हंगामाची प्रशासन स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ तारखेनंतरच पावसाचा अंदाज असल्याने २२ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करूच नये. जुलै महिन्यात ६ तारखेनंतर पुन्हा पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत पेरण्या केल्या जाऊ शकतात. 
- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

विभाग - टँकर
- नाशिक - ११९
- कोकण - ११५
- पुणे - ७९
- औरंगाबाद - ९४
- अमरावती - ८७
- नागपूर - ७

सर्वात कमी विदर्भात 
राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १४ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ३२.०४ टक्के तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सरासरीच्या ११.०९ टक्के पाऊस झाला आहे. 

Web Title: Farmers do not sowing till 15th July Maharashtra is worried water supply is declining rapidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.