दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

By Admin | Published: August 10, 2015 12:57 AM2015-08-10T00:57:02+5:302015-08-10T00:57:02+5:30

राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या

Farmers' families are more important than donors | दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

googlenewsNext

बीड : राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे व त्यांचा अस्ताव्यस्त झालेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अधिक गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
नानांनी बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत तर केलीच; शिवाय त्यांचे मनोधैर्यही वाढविले. बीडचा भूमिपुत्र व अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लेखक अरविंद जगताप, नितीन नेरुळकर, अमोल अंकुटे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला.
नाना म्हणाले, माणसातल्या संवेदना जागृत करण्याचे मोठे आव्हान आज आमच्यापुढे उभे ठाकले आहे. मी येथे केवळ कार्यक्रमाला आलो नसून पीडित शेतकरी कुटुंबांसाठी काय करता येईल, यासाठी आलो आहे. सरकार मदत देईल तेव्हा देईल, पण मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना मदतीचा हात देत आहे. पुस्तकांपेक्षा माणसं वाचायची सवय प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असेही पाटेकर यांनी सांगितले. प्रत्येकात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. ती ओळखण्याची दृष्टी शेतकऱ्यांनी ठेवावी. यापुढे आत्महत्येसारखे मार्ग सोडून द्यावे असे आवाहन नाना यांनी केले.
माणसात परमेश्वर बघा, केवळ महापुरुषांची नावे घेऊन कोट्यवधी रुपये गोळा करणारी अनेक माणसे आहेत. मात्र ते समाजासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी चळवळी उभारणे आवश्यक आहे. जोपर्यंत नानांसारखी माणसं समाजात आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची गरज नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers' families are more important than donors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.