शेतकरी कुटुंबाची व्यथा पाहून गहिवरले आमदार, फवारणीच्या औषधांमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 04:27 PM2017-10-07T16:27:56+5:302017-10-07T16:28:28+5:30

शेतक-यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या विषारी औषध बनविणाऱ्या कंपनीची कसून चौकशी करून यावर दोषी सर्व लोकांवर कठोर कारवाई व्हावी.

Farmers, family members who were victimized by spraying drugs | शेतकरी कुटुंबाची व्यथा पाहून गहिवरले आमदार, फवारणीच्या औषधांमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांची घेतली भेट

शेतकरी कुटुंबाची व्यथा पाहून गहिवरले आमदार, फवारणीच्या औषधांमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांची घेतली भेट

Next

अमरावती - यवतमाळ जिल्ह्यातील झालेल्या अतिविषारी फवारणीच्या औषधांनी नाहक बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना भेटून सांत्वन करून याबाबत अधिक माहिती व मदत व्हावी या दृष्टीने  आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह नेमलेल्या ५ विधानसभा सदस्यांच्या समितीने शनिवारी भेट दिली. मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची व रुग्णालयात दाखल असलेल्या शेतमजुरांची भेट घेतली.

शेतक-यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या विषारी औषध बनविणाऱ्या कंपनीची कसून चौकशी करून यावर दोषी सर्व लोकांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसह यास बळी पडलेल्या व जखमी शेतकरी कुटुंबांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.

मृत मेटांगे व बंडू जनार्दन सोनूरले या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करून माणोली , टिटवी, वणी या गावातसुध्दा समितीने भेट दिली. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही भेट घेऊन यावर बैठक पार पडली व त्यांना न्याय मिळावा याबाबत आमदार यशोमती ठाकूर व समितीने मागणी रेटून धरली। येत्या हिवाळी अधिवेशनात यावर प्रश्न उचलून सरकारला धारेवर धरुं, असे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार विरेंद्र जगताप यांनी सांगितले.

Web Title: Farmers, family members who were victimized by spraying drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.