मोदींकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Published: May 23, 2017 03:22 AM2017-05-23T03:22:29+5:302017-05-23T03:22:29+5:30
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे वक्तव्य करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले तेच खालीही खेचू शकतात, हे विसरू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुणे ते मुंबईदरम्यान आत्मक्लेश पदयात्रेस सोमवारी महात्मा फुले वाडा येथून सुरूवात झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,रविकांत तनपुरे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, तृतियपंथी संघटनेच्या लक्ष्मी त्रिपाठी आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लहान मुले-मुलीसुद्धा आत्मक्लेश यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबा आढाव म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नसून देशातील शेतक-यांचा प्रश्न आहे.