शेतकऱ्यांनी मैदान सोडलेलेच नाही - नवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:02 AM2018-05-02T05:02:19+5:302018-05-02T05:02:19+5:30
महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण
सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण आता दोन महिने उलटले तरी, या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. भाजपने पुन्हा आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली असली तरी, शेतकºयांच्या पोरांनी अजून मैदान सोडलेले नाही, अशा शब्दात सरकारवर हल्ला चढवत, शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती दिनापासून पुन्हा आंदोलन हाती घेत असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस अॅड. अजित नवले यांनी सोमवारी सांगितले.
सांगलीत मराठा सेवा संघाच्या सभागृहात किसान सभेचा मेळावा झाला, यावेळी नवले बोलत
होते. नवले म्हणाले की, भाजपने शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी संप व लाँग मार्चवेळी सरकारने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधीही मागून घेतला. पण आता दोन महिने झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. कर्जमाफीच्या निकषात बदल केले, पण सरसकट कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघालेला नाही.