शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:01:04+5:30

मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले. अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करावी. विटाभट्टी परवान्यासाठी अकृषकची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

The farmers hit the tehsil office | शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे नेतृत्व : सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकºयांनी सोमवारी आरमोरी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.
अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करावी. विटाभट्टी परवान्यासाठी अकृषकची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
आरमोरी येथील राम मंदिरापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी तहसीलच्या गेटवर जाऊन निवेदन स्वीकारले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, राजू अंबानी, माजी जि.प. सदस्य लक्ष्मी मने, वेणुताई ढवगाये, सुनील पोरेड्डीवार, आरमोरी तालुका प्रमुख महेंद्र शेंडे, शहर प्रमुख पंकज आखाडे, अंकुश खरवडे, मेघा मने, हेमलता वाघाडे, बुधा किरमे, विलास दाने, बाळा बोरकर, ज्ञानेश्वर ढवगाये, भजन मारभते, पितांबर लांजेवार, अशोक खेवले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: The farmers hit the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी