डीपीसाठी शेतकऱ्यांनी अभियंत्यालाच पळविले, हिंगोलीतील घटना, नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 02:32 AM2018-03-24T02:32:37+5:302018-03-24T02:32:37+5:30

पाच महिन्यांपासून जळालेले विद्युत रोहीत्र (डीपी) मिळत नसल्याने वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील संतप्त शेतक-यांनी हिंगोलीच्या अभियंत्यालाच उचलून शेतात आणले. डीपी आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत अभियंत्याला सोडणार नसल्याचा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.

 Farmers ignored the engineer for DP, Hingoli incidents, till the compensation was received | डीपीसाठी शेतकऱ्यांनी अभियंत्यालाच पळविले, हिंगोलीतील घटना, नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन

डीपीसाठी शेतकऱ्यांनी अभियंत्यालाच पळविले, हिंगोलीतील घटना, नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन

googlenewsNext

- चंद्रकांत देवणे

वसमत (जि. हिंगोली) : पाच महिन्यांपासून जळालेले विद्युत रोहीत्र (डीपी) मिळत नसल्याने वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील संतप्त शेतक-यांनी हिंगोलीच्या अभियंत्यालाच उचलून शेतात आणले. डीपी आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत अभियंत्याला सोडणार नसल्याचा पवित्रा गावक-यांनी घेतला आहे.
१९ शेतकºयांचे या डीपीवर कृषीपंप चालतात. बागायती पिकांसह हळदीसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. नव्या डीपीसाठी शेतकºयांनी प्रत्येकी पाच हजार पाचशे रुपये तसेच वीजबिलही भरले. एक डीपी मिळाला. मात्र तो जळालेलाच होता. पुन्हा दुसºया डीपीसाठी हिंगोली येथे चकरा सुरू झाल्या. विजेविना पाच महिन्यांपासून पिकांना पाणी देता आलेले नाही. त्यामुळे पिके वाळून गेली. हळदीच्या पिकाचे नुकसान झाले. साहजिकच शेतकरी संतापले.
शुक्रवारी म्हातारगावसाठी १00 ऐवजी ६५ एमव्हीएचा डीपी दिल्याने संतापात भर पडली. १00 ची गेटपास असताना हा डीपी का दिला, असा सवाल करण्यासाठी शेतकरी हिंगोलीला गेले. मात्र तेथे महावितरणचे अधिकारी बोलायलाही तयार नव्हते. संतापलेल्या शेतकºयांनी अभियंता एस. डी. बेलसरे यांना चौकशी करण्याच्या बहाण्याने हिंगोली एमआयडीसीमध्ये आणले. त्यानंतर गाडी हिंगोलीकडे नेण्याऐवजी थेट वसमतकडे नेली.
आमच्या शेतात चला, आमचे झालेले नुकसान पहा अन् मगच तुम्हाला सोडतो, असे सांगून ते म्हातारगावात गेले.

नुकसान भरपाई व डीपी मिळेपर्यंत अभियंता म्हातारगावलाच सुखरूप राहतील. त्यांना कुठलीही इजा होणार नाही. त्यांची योग्य ती काळजीही घेतली जाईल. शासन-प्रशासनाला आव्हान देण्याचा हेतू नसल्याचे बाजार समिती संचालक तुषार जाधव यांनी सांगितले.

शेतकºयांनी येथे बळजबरीने आणले, मात्र मी सुखरूप आहे. - एस. डी. बेलसरे, अभियंता
हिंगोलीचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी म्हातारगाव येथे संपर्क साधून शहानिशा केली. वीज वितरणच्या इतर अधिकाºयांना तातडीने म्हातारगावला पाठवले.

Web Title:  Farmers ignored the engineer for DP, Hingoli incidents, till the compensation was received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी