शिक्षणासाठी शेतकरीपुत्र पुण्यात रवाना
By Admin | Published: January 17, 2016 02:52 AM2016-01-17T02:52:37+5:302016-01-17T02:52:37+5:30
भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) शैक्षणिक प्रकल्पासाठी निवड झालेले जिल्ह्यातील ३८ शेतकरीपुत्र शनिवारी पुणे येथे रवाना झाले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी
यवतमाळ : भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) शैक्षणिक प्रकल्पासाठी निवड झालेले जिल्ह्यातील ३८ शेतकरीपुत्र शनिवारी पुणे येथे रवाना झाले. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह
यांनी या विद्यार्थ्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखविला. यवतमाळच्या केसरिया भवनातील भावपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर
दर्डा होते.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांची निवड बीजेएस आणि लोकमतच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, राष्ट्रीय महामंत्री महेश कोठारी, नियोजित राज्याध्यक्ष अमरचंद गांधी, पश्चिम विभागीय अध्यक्ष समीप इंदाने, श्वेतांबर मूर्तिपूजक श्रीसंघाचे अध्यक्ष प्रकाशमल बोथरा आदी या वेळी उपस्थित होते.
प्रकल्पातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १० विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण देण्यासाठी आपण सहकार्य करू, असे लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी आश्वस्त केल्याचे किशोर दर्डा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत निवड
प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांची निवड बीजेएस आणि लोकमतच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. या निवडलेल्या मुला-मुलींचा पहिला जत्था शनिवारी पुण्याकडे रवाना झाला.