शेतक:यांना वा:यावर सोडले
By Admin | Published: October 5, 2014 02:27 AM2014-10-05T02:27:05+5:302014-10-05T02:27:05+5:30
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकारने त्यांना वा:यावर सोडले, असा थेट आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोल्यातील सभेत केला.
>उद्धव यांची थेट मोदींवर टीका : आता त्यांना हिंदुत्व नकोसे झाले
अकोला : पाकव्याप्त काश्मिरातील पूरग्रस्तांना मदत देणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदर्भातील शेतक:यांना काय दिले? महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकारने त्यांना वा:यावर सोडले, असा थेट आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोल्यातील सभेत केला.
युती तुटल्यानंतर आज प्रथमच उद्धव यांनी मोदींवर थेट टीका केली. मोदी हे भाजपाचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहेत, हे त्यांनी विसरू नये, असा सल्ला देत उद्धव म्हणाले, की अच्छे दिन देण्याचे आश्वासन देणा:या भाजपाने शेतक:यांसाठी काहीच केले नाही. दुष्काळाच्या झळा महाराष्ट्राला बसत असताना केंद्र शासनाने त्याची दखलही घेतली नाही. महाराष्ट्राला वा:यावर सोडले. हिंदुत्वाच्या नावावर दिल्लीत सत्ता मिळविल्यानंतर भाजपाला आता हिंदुत्व नकोसे झाले आहे. भाजपा हा विश्वासघातकी मित्र असून, महाराष्ट्रातील जनता आता या पक्षावर विश्वास ठेवणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
जनतेनेच विचार करावा
लोकसभा निवडणुकीत सेनेने मोदींसाठी मतं मागितली. महाराष्ट्रात मोदी शिवसेनेसाठी नाही तर भाजपासाठी मतं मागतील. शिवसैनिकांनी तसेच जनतेने याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी भाजपाकडे राज्यातील चेहराच नसल्याने त्यांना मोदींच्या नावावर मतं मागावी लागत असल्याची टीकाही उद्धव यांनी केली.