हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून

By Admin | Published: June 5, 2017 10:42 PM2017-06-05T22:42:58+5:302017-06-05T22:42:58+5:30

तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली

Farmer's murder at Datada in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून

हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
 
सेनगाव (हिंगोली), दि. 5 - तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली असून, शेतीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 
 
दाताडा बु. येथील दत्तराव नामाजी जाधव (५५) हे नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीला शेतातील आखाड्यावर झोपायला गेले; परंतु दुसºया दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत घरी आले नसल्याने त्याना शोधण्यासाठी शेतात शोध घेतला असता आखाड्यावरील झोपण्याच्या बाजेवर दत्तराव जाधव हे संशस्यास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळले. मयत दत्तराव जाधव यांच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा असून घटनास्थळी दुपारी २ वाता सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्यासह पथकाने भेट देऊन एकूण संशयास्पद स्थितीच्या अनुषंगाने खुनाच्या दिशेने सदर घटनेचा तपास चालू केला आहे. 
 
सदर खून हा शेताच्या वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेने तपासाकरिता मयताच्या पत्नीच्या आरोपावरून पोलिसांनी दोन नातेवाईकांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे, असे सांगण्यात आले. 
 
 मयत दत्ता जाधव यांचे प्रेत सायंकाळी उशिरा कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात  आणून शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा सेनगाव पोलिस ठाण्यात मयताची पत्नी जनाबाई दत्तराव जाधव हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. घटना स्थळास ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र रात्री १०.३० वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Farmer's murder at Datada in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.