शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:45 AM2019-11-17T03:45:59+5:302019-11-17T03:46:07+5:30
महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार
ठाणे : सत्तास्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असून त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निधीदेखील सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील, अशी जी अपेक्षा करण्यात आली होती, ती एवढ्या लवकर पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्टÑवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकºयांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहेत. शनिवारी महाआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेविषयी काही हालचाली करतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मात्र शेतकºयांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रि या दिली. यावेळी महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलेल्या नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.