शेतकरी संप : शेतक-यांनी मुंडण करुन शासनाचा नोंदवला निषेध

By Admin | Published: June 5, 2017 01:38 PM2017-06-05T13:38:17+5:302017-06-05T13:38:17+5:30

कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे.

Farmer's property: Farmer's head shaved and registered government protest | शेतकरी संप : शेतक-यांनी मुंडण करुन शासनाचा नोंदवला निषेध

शेतकरी संप : शेतक-यांनी मुंडण करुन शासनाचा नोंदवला निषेध

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 5 - कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास शासनाकडून होत असेलल्या दिरंगाईला विरोध दर्शवण्यासाठी शेतक-यांनी बसस्थानक चौकात मुंडण करून शासनाचा निषेध केला. 
 
तसंच यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंब फाटा आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील भांबराजा येथे  चक्काजाम आंदोलन करण्यात आल्यानं येथील वाहतूक ठप्प झाली होती.
(शेतकरी संप : नाशिकमध्ये फडणवीस सरकारची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा)
तर नाशिकमधील वडांगळी येथे आंदोलकर्त्या शेतक-यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  तर चांदवड येथे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांचा ""महाराष्ट्र बंद"" उर्त्स्फुत  प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे.
 
लासलगाव-चांदवड रस्त्यावर शिवसेनेच्या वतीनं रास्तारोको करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या सह 5 ते 6  शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लासलगाव, चांदवड, ठेंगोडा येथील व्यापाऱ्यांनीही  दुकाने 100 टक्के बंद ठेऊन संपला पाठिंबा दर्शवला आहे. तर नांदूर शिंगोटे, भोजापूर खोरे, दोडी, दापूर, मानोरी इत्यादी भागांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.                        
(VIDEO : जळगावात काढली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा)
शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांची  पूर्तता करण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून संपात सहभागी झालेल्या जळगावातील उंबरखेडमधील शेतक-यांनी सोमवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
या अंत्ययात्रेत उपसरपंच सोमनाथ निकम, वाल्मिक पाटील, संजय पाटील,  दीपक खंडाळे, शिवसेना युवा मोर्चाचे भरत पाटील, ग्रा.पं सदस्य जितेंद्र पाटील, सुनिल अहिरे, प्रमोद पाटील, महादु महाजन, राहुल गोसावी आदी शेतकरी सहभागी झाले होते.
 

Web Title: Farmer's property: Farmer's head shaved and registered government protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.