पुणतांब्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

By admin | Published: May 26, 2017 03:45 AM2017-05-26T03:45:00+5:302017-05-26T03:45:00+5:30

कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून पुणतांब्यात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.

Farmers protest in Puntamban continue the movement | पुणतांब्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

पुणतांब्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणतांबा (जि. अहमदनगर) : कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून पुणतांब्यात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांनी निर्धार केल्यानुसार पुणतांबा येथे ३१ मेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. १ जूनपासूनच्या संपाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास शहराकडे जाणारा दूध, भाजीपाला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती किसान क्रांतीच्या समन्वयकांनी दिली. शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. या संपाची माहिती मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांना दिली आहे. ३० मे रोजी राज्यमंत्री खोत आंदोलकांना भेटणार आहेत.

Web Title: Farmers protest in Puntamban continue the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.