पुणतांब्यात शेतक-यांचा दिवाळीत पुन्हा एल्गार, देशव्यापी लढ्यासाठी २० आॅक्टोबरला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:44 AM2017-10-03T03:44:04+5:302017-10-03T03:44:13+5:30
राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नांवर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.
पुणतांबा (अहमदनगर) : राज्यात शेतकरी आंदोलनाचा लढा सुरू करणा-या पुणतांब्यातून २० आॅक्टोबरला दिवाळीतील बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शेतक-यांच्या प्रश्नांवर देशव्यापी लढ्याचा एल्गार पुकारण्यात येणार आहे.
राज्यात शेतकरी आंदोलनाची ज्योत पेटविणा-या किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी ही माहिती दिली. देशव्यापी लढ्याचे नियोजन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणतांबा पुन्हा चळवळीचे केंद्र ठरणार आहे. राज्यातील शेतकºयांच्या
अभूतपूर्व संपाला १ जूनपासून पुणतांब्यातून सुरुवात झाली होती. त्याचे लोण राज्यात पोहोचवून सरकारला दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर करावी लागली.
पुणतांब्यातील शेतकरी संपाची धग राज्यभरात पसरली. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र म्हणून पुणतांब्याचे नाव राज्यभरात पोहोचले. कर्जमाफी जाहीर झाली असली, तरी शेतकºयांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित
आहेत. त्यासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. त्याच्या नियोजनासाठी २० आॅक्टोबरला पुणतांब्यात देशव्यापी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याचे जाधव यांनी सांगितले.
किसान क्रांतीच्या वतीने विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर टाळून गावराण बियाण्यांचा वापर करावा, हे घोषवाक्य फलकावर लिहिले होते. या वेळी जाधव म्हणाले, १ जूनच्या संपामुळे मोठी क्रांती झाली. त्यामुळे राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आता रासायनिक खतांचा वापर न करता गावरान बियाणे वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शेतात राबणारा
शेतकरी घाम गाळत असून
व्यापारी, उद्योजक मालामाल झाले आहेत.