शेतकऱ्यांची बियाणे बँक

By admin | Published: May 1, 2017 05:14 AM2017-05-01T05:14:49+5:302017-05-01T05:14:49+5:30

वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस

Farmer's Seed Bank | शेतकऱ्यांची बियाणे बँक

शेतकऱ्यांची बियाणे बँक

Next

नीलेश धोपेश्वरकर / ठाणे/पालघर
वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या बातम्यांमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, अशी बातमी रोज आपण वाचतो किंवा पाहतो. हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न पडतो. पण, समाजात अशा काही व्यक्ती किंवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांचे खासकरून आदिवासी भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पालघर जिल्ह्यातील संजय पाटील आणि बायफ संस्था.

पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील ११ गावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील एतापल्लीमधील १५, नंदुरबार जिल्ह्यातील धडगावमधील १२, पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील ६ आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील १० अशा सुमारे ५४ गावांमध्ये बियाणांचे संशोधन, संवर्धनाचे काम सुरू आहे. यातील बहुतांश पट्टा हा आदिवासी आहे. अशा संवर्धनातून बियाणांची बँक तयार झाली. यातून शेतीच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे ते म्हणाले. कमी किंवा दुर्मीळ होत चाललेली पिके किंवा बियाणे यांचे पुनरुज्जीवनही केले जाते.
बायफसारखी संस्था पाठीशी खंबीरपणे उभी असल्याने या उपक्रमाला यश मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्यामुळे कामाला गती आणि दिशा मिळाली.
एकाच प्रकारची पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत कसा राखला जाईल, तग धरणारी कुठली पिके, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. बियाणांची स्वायत्तता, सुरक्षिततेबरोबरच बँकेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे, हाही हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे चार भिंतींत संशोधन केले जाते. आम्ही थेट शेतात जाऊन ते करतो. तेही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत. बियाणे वापरण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते, असे पाटील यांनी सांगितले. संशोधन करून बियाणे तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाने ते रजिस्टर करण्यासाठी बायफ संस्था पुढाकार घेते.

दोघांना राष्ट्रीय पुरस्कार

जव्हार तालुक्यातील चौक गावातील मावंजी पवार या तरुणाने वडिलांबरोबर शेती करत असतानाच बायफच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्याने भाताच्या वाणाच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. संवर्धन, संशोधनातील उत्कृष्ट कार्याबद्दल मावंजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर, जव्हार तालुक्यातीलच सुनील कामोदी याने भाताचे अश्विनी नावाचे वाण बायफच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने तयार केले. त्यालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले.

Web Title: Farmer's Seed Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.