रब्बी हंगामासाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - पांडुरंग फुंडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 23:09 IST2017-11-20T23:09:41+5:302017-11-20T23:09:45+5:30
राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागाची अंतिम मुदत सोलापूर जिल्हयातील रब्बी ज्वारी पिकाकरिता दिनांक 30 नोव्हेंबर, 2017 आहे.

रब्बी हंगामासाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - पांडुरंग फुंडकर
मुंबई : राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागाची अंतिम मुदत सोलापूर जिल्हयातील रब्बी ज्वारी पिकाकरिता दिनांक 30 नोव्हेंबर, 2017 आहे. अन्य जिल्हयांतील सर्व अधिसुचित पिकांकरिता सहभागाची मुदत दि. 01 जानेवारी 2018 आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
शेतकरी बांधवांना या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व ह्लआपले सरकार सेवा केंद्रह्व (डिजीटल सेवा केंद्र) येथे विमा अर्ज सादर करता येतील. तरी शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज याठिकाणी जमा करावेत.
त्याचबरोबर योजनेतील सहभागासाठी नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी केले आहे.