शेतकऱ्यांनी तुरीसाठी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Published: April 25, 2017 02:29 AM2017-04-25T02:29:31+5:302017-04-25T02:29:31+5:30

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात तीन महिन्यांत राज्यात सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे.

Farmers should take advantage of Karmachalaya Mortal Loan Scheme for the loan | शेतकऱ्यांनी तुरीसाठी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी तुरीसाठी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

Next

सोलापूर : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात तीन महिन्यांत राज्यात सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या सूचनेनुसार २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तूर कमी भावाने न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
तीन महिने तूर खरेदी करूनही खरेदी केंद्रांवर केंद्रावर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत ९० बाजार समित्यांमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. चालू हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांनी २.१० लाख क्विंटल शेतमाल या योजनेअंतर्गत साठविला आहे. शेतकऱ्यांना त्यांची तूर कमी भावाने बाजारात न विकता बाजार समितीच्या गोदामात ठेवून त्यावर केवळ ६% दराने तारण कर्ज घेता येईल, असे ते म्हणाले. हा माल गोदामात साठविण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही. या मालाचे संरक्षण व विम्याचा खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येतो. शेतकऱ्यांनी गोदामात माल ठेवल्यास समितीकडून तुरीच्या बाजारभावाच्या ७५% एवढी रक्कम तारण कर्ज म्हणून दिली जाते.

Web Title: Farmers should take advantage of Karmachalaya Mortal Loan Scheme for the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.