शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

By admin | Published: April 22, 2017 12:01 AM2017-04-22T00:01:33+5:302017-04-22T00:01:33+5:30

चांदवड :बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी सर्वच व्यापारी लिलावात बोली बोलत नाही या कारणावरून शेतकऱ्यांनी शेतमालाचे लिलाव बंद पाडले होते

Farmers shut down auction | शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

Next

कवठेमहांकाळ : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या मिनी बसने मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने सातजण ठार, तर बाराजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा समावेश आहे. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ शेळकेवाडी हद्दीत शुक्रवारी पहाटे चार वाजता घडला. सर्व अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे (ता. करवीर) येथील आहेत.
अपघातात विनायक मार्तंड लोंढे (वय ५0), गौरव राजू नरदे (९), लखन राजू संकाजी (३0), रेणुका नंदकुमार हेगडे (३५), नंदकुमार जयराम हेगडे (४0), आदित्य नंदकुमार हेगडे (१३, सर्व रा. मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, कोयना कॉलनी, वळीवडे, गांधीनगर) जागीच ठार झाले, तर रेखा राजाराम देवकुळे (४0) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्नेहल ऊर्फ नेहा कृष्णात हेगडे (२0), काजल कृष्णात हेगडे (१९), कल्पना शाहू बाबर (३५), कोमल सुनील हेगडे (२१), शीला सुनील हेगडे (३९), सारिका संजय कांबळे (४0), शुभम संजय कांबळे (८), भारती संजय कांबळे (२0), सावित्री बळवंत आवळे (५५), अनमोल नंदकुमार हेगडे (१२), श्वेता कृष्णात हेगडे (१५), गौरी ऊर्फ संस्कृती कृष्णात हेगडे (८) जखमी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील कोयना कॉलनीजवळच्या म्हसोबाचा माळ येथील भाविक देवदर्शनासाठी सोमवारी मिनी बस (क्र. एमएच २० एच २५४३) आणि जीपने गेले होते.जेवण करून रात्रीच गावाकडे परत येण्यास निघाले. मिनी बसमध्ये चालकासह २0 भाविक होते. त्यांच्यासोबतची जीप पुढे निघून गेली होती. शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान मिरज-पंढरपूर मार्गावर शेळकेवाडी हद्दीतील आगळगाव फाटा येथे मिनी बस आली असता, रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रकला (क्र. एमएच ०८ एच ९२९९) तिने जोराची धडक दिली. त्यात मिनी बसमधील सहाजण जागीच ठार झाले, तर तेराजण गंभीर जखमी झाले. त्यातील रेखा देवकुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर मिनी बसचा चालक संदीप यादव फरार झाला.
अपघातात मिनी बसचा चक्काचूर झाला. घटनास्थळी भाविकांच्या पिशव्या, जेवणाचे पदार्थ, प्रसाद आदी साहित्य विखरून पडले होते.
किरकोळ जखमींनी भाविकांच्या पुढे गेलेल्या जीपमधील सहप्रवाशांशी संपर्क साधला व त्यांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमाळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व रस्त्यावरील प्रवाशांच्या मदतीने अपघातग्रस्त मिनीबस बाजूला काढण्यात आली. त्यातील जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
सर्व मृतांचे शवविच्छेदन कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)



बघ्यांची गर्दी आणि मदत
अपघात एवढा भीषण होता की, मिनी बसचा चक्काचूर झाला. पहाटे बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. मृतांना आणि जखमींना हलविण्यासाठी नागरिकांनीच पोलिसांना मदत केली.

हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयासमोर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती. तेथे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

दाम्पत्यासह मुलगा आणि सासू ठार
या अपघातात नंदकुमार हेगडे, त्यांची पत्नी रेणुका, मुलगा आदित्य जागीच ठार झाले, तर हेगडे यांच्या सासू रेखा देवकुळे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत होती.

मार्गावरील सर्वात मोठा अपघात
मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या रस्त्याचे नुकतेच नव्याने डांबरीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत असतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. मात्र या मार्गावरील हा सर्वांत मोठा अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले.







मृतांवर एकत्रित अंत्यसंस्कार
वळिवडे (ता. करवीर) येथील कोयना कॉलनीमधील म्हसोबा माळ येथे शुक्रवारी शोककळा पसरली. कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन केले. सायंकाळी वळिवडे येथे मृतदेहांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार केले. -वृत्त/५

अपघातातील दोघांची प्रकृती गंभीर
अपघातातील जखमींना मिरज शासकीय रूग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी स्रेहल कृष्णात हेगडे, काजल कृष्णात हेगडे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. सावित्री बळवंत आवळे, शीतल सुनील हेगडे, सोनल कांबळे, कोमल हेगडे, कल्पना बाबर, अनमोल हेगडे, गौरी हेगडे, शुभम कांबळे या अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Farmers shut down auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.