विदर्भातील शेतकरीपुत्र; ‘सर्जिकल स्टाइक’चे केले नेतृत्व, जनरल निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:23 AM2018-01-26T03:23:41+5:302018-01-26T03:23:51+5:30
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिरून भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक’ची योजना आणि अंमलबजावणी करणा-या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. वर्ध्यातील वडाळा या लहानशा गावातील शेतकरीपुत्र ते लेफ्टनंट जनरल असा थक्क करणारा प्रवास करणाºया निंभोरकर यांच्या खांद्यावर सध्या जम्मू-काश्मीर येथील सीमा रक्षणाची जबाबदारी आहे.
संकेत सातोपे
मुंबई : काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिरून भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक’ची योजना आणि अंमलबजावणी करणा-या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. वर्ध्यातील वडाळा या लहानशा गावातील शेतकरीपुत्र ते लेफ्टनंट जनरल असा थक्क करणारा प्रवास करणाºया निंभोरकर यांच्या खांद्यावर सध्या जम्मू-काश्मीर येथील सीमा रक्षणाची जबाबदारी आहे.
पंजाब रेजिमेंटच्या कर्नल आॅफ रेजिमेंट हा मानाचा किताबही निंभोरकर यांना बहाल करण्यात आला असून लेफ्ट. जन. थोरात यांच्यानंतर असा किताब मिळविणारे ते एकमेव मराठी अधिकारी आहेत. निंभोरकर यांनी आजवर लेह, कारगिल, काश्मीर खोरे, पुंछ, ईशान्य भारत आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. मेजर म्हणून बारामुल्ला भागात तैनात असताना त्यांनी तब्बल २२ अतिरेक्यांना कंठस्रान घातले होते. तसेच राजौरी भागात आॅपरेशन विजयदरम्यान शत्रूशी लढताना ते गंभीर जखमी झाले होते. आजवर त्यांना युद्ध सेवा, विशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा अशा अनेक पदकांनी गौरविण्यात आले आहे.
अत्यंत हलाखीत बालपण गेल्यानंतर निंभोरकर यांनी सातारा सैनिकी शाळा, राष्टÑीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय लष्करी अकादमी असा प्रवास करीत लष्करात सर्वोच्च पद गाठले. विशेष म्हणजे त्यांचा एक भाऊ वायुदलात, तसेच दुसरा भाऊ, कन्या आणि जावई नौदलात आहेत.