शेतक-यांचा मुक्काम महा ई-सेवा केंद्रावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:58 AM2017-08-28T05:58:51+5:302017-08-28T05:59:00+5:30
जानेफळ (बुलडाणा) : कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी महा ई-सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने, प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी, शेतक-यांना या केंद्रावरच रात्री मुक्काम करावा लागत आहे.
संग्राम केंद्र, आपले सरकार आणि खासगी महा ई-सेवा केंद्रामार्फत सध्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरले जात आहेत, परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्जमाफी मिळण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सर्व्हर डाउनमुळे आॅनलाइन अर्ज भरण्यास प्रचंड वेळ लागत आहे.