महाराष्ट्रातील शेतकरी संपाचा गोव्याला फटका
By admin | Published: June 2, 2017 11:37 AM2017-06-02T11:37:34+5:302017-06-02T11:37:34+5:30
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फटका गोव्याला बसला आहे. गोव्यात महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात दूध आयात केले जाते.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 2 - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाचा फटका गोव्याला बसला आहे. गोव्यात महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात दूध आयात केले जाते. गोकुळ, वारणा या डेअरींकडून जवळपास 70 हजार लीटर दूधाचा पुरवठा गोव्यात दर दिवशी होत असतो.
संपामुळे हे दूध गोव्यात येऊ शकले नाही. त्यामुळे गुजरात येथून येणाऱ्या अमूल आणि कर्नाटक येथून येणाऱ्या नंदिनी,आरोग्य,श्रीकृष्ण,सह्याद्रि,महानंद आदी दूध डेअरीकडून होणाऱ्या दूध पुरवठयावर अवलंबून रहावे लागले.
अनेक दूध विक्रेत्यांना संपाची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी गुजरात आणि कर्नाटक मधून दुधाची अतिरिक्त मागणी नोंदवली पण मागणीच्या तुलनेत ते कमी पडले.भाजीपाला आणि अन्नधान्याचा तूटवडा जाणवणार असा दावा फलोत्पादन महामंडळाने केला आहे.