शेतकरी आत्महत्या

By Admin | Published: January 8, 2016 11:20 PM2016-01-08T23:20:12+5:302016-01-09T02:41:41+5:30

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या .

Farmers Suicide | शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

googlenewsNext

खंडाळा (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील महादेव पूर्णाजी सांगुनवेढे (६५) या शेतकर्‍याने शुक्रवारी आत्महत्या केली. सांगुनवेढे यांच्याकडे एक एकर शेती होती. त्यांनी केळीचे पीक घेतले; मात्र सततच्या नापिकीमुळे ते हवालदिल झाले होते. शुक्रवारी सकाळी ते शेतात गेले व कीटकनाशक प्राशान केले त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. महादेव सांगूनवेढे यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज आहे.  

Web Title: Farmers Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.