मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने शेतक-याची आत्महत्या

By admin | Published: April 20, 2017 01:38 PM2017-04-20T13:38:51+5:302017-04-20T13:40:29+5:30

अल्प भूधारक शेतकरी शिवराम बाळूराम सूर्यवंशी (45) यांनी आपल्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली

The farmer's suicide due to lack of dowry for the girl's marriage | मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने शेतक-याची आत्महत्या

मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने शेतक-याची आत्महत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 20 - एका मुलीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच हुंड्यामुळे एका शेतक-याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अल्प भूधारक शेतकरी शिवराम बाळूराम सूर्यवंशी (45) यांनी आपल्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली.  मुलीच्या लग्नासाठी हुंडा आणि खर्चाची जमवाजमव होऊ शकत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा गावातील ही घटना आहे.
 
मुलीचं लग्न ठरलं असताना हुंडा आणि लग्नाचा खर्च उचलण्यासाठी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने शिवराम सुर्यवंशी यांच्यावर दडपण आलं होतं. शेवटी हात मोकळेच राहिल्याने शिवराम बाळूराम सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली. स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी अत्महत्या केली. 
 
औराद शा. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिवराम सूर्यवंशी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.
 
धक्कादायक म्हणजे लातूर जिल्ह्यातच एका मुलीने काही दिवसांपूर्वी हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्हत्या केली होती. 
 
शीतल वायाळची आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथील २१ वर्षाच्या शीतल व्यंकट वायाळ या शेतकऱ्याच्या मुलीने शेतातील नापिकी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली. शेतातील विहिरीत उडी मारून तिने आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी तिने एक पत्र लिहून ठेवले असून त्यात तिने आपल्या घरची परिस्थिती विषद केली आहे. दोन बहिणींचे कसे-बसे लग्न करणाऱ्या आपल्या वडिलांना आपल्या लग्नासाठी कुणी कर्जही देत नाही. कारण गेल्या ४ वर्षांपासून शेतातही काही पिकत नाही. त्यामुळे घरची हलाखीची परिस्थिती न पहावल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तिने लिहिले होते. आपण केलेल्या या कृत्यामुळे घरातील कुणालाही जबाबदार धरू नये असेही तिने शेवटी नमूद करीत आपले नाव लिहिले होते.
 

Web Title: The farmer's suicide due to lack of dowry for the girl's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.