विवाहासाठी पैसे नसल्याने शेतकरीकन्येची आत्महत्या

By admin | Published: April 15, 2017 01:38 AM2017-04-15T01:38:08+5:302017-04-15T01:38:08+5:30

विवाहासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या एका २१ वर्षीय तरुणीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी भिसे वाघोली (ता़ लातूर) येथे घडली.

Farmer's suicide due to lack of money for marriage | विवाहासाठी पैसे नसल्याने शेतकरीकन्येची आत्महत्या

विवाहासाठी पैसे नसल्याने शेतकरीकन्येची आत्महत्या

Next

मुरुड (जि़ लातूर) : विवाहासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या एका २१ वर्षीय तरुणीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी भिसे वाघोली (ता़ लातूर) येथे घडली.
शीतल व्यंकट वायाळ असे या युवतीचे नाव आहे़ व्यंकट वायाळ यांची साडेपाच एकर शेती असून कुटुंबात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले आहेत़ त्यांच्या दोन मुलींचा विवाह झाला आहे़ त्यांचा मोठा मुलगा लातुरात तर लहान मुलगा गावातील शाळेत शिक्षण घेत आहे़
शेतीसाठी त्यांनी जिल्हा बँक, सहकारी संस्था व कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याकडून कर्ज काढले होते़ परंतु, शेतीतून काहीही उत्पन्न न निघाल्याने ते चिंताग्रस्त होते़ पैशाअभावी दोन वर्षांपासून शीतल हिचा थांबला होता. यातूनच तिने शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली़ आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली असून मी स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे़

रुढी-परंपरा कमी करण्यासाठी़़़
शेतातील सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक आहे़ माझ्या दोन बहिणींचे लग्न गेटकेन (अत्यंत साधेपणाने) करण्यात आले़ परंतु, माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून वडिलांचे दारिद्र्य संपत नव्हते. कुठलीही बँक, सावकाराकडून कर्ज न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून थांबले होते़ वडिलांवरील ओझे कमी करण्यासाठी व समाजातील रुढी-परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी आत्महत्या करीत आहे़ मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये, असे शीतलने म्हटले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Farmer's suicide due to lack of money for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.