नापिकीमुळे शेतक-याची आत्महत्या, मदतीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:00 AM2017-08-28T06:00:59+5:302017-08-28T06:01:07+5:30

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील दीक्षीत रूपचंद हजारे या ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने, रविवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली.

 The farmer's suicide due to napikis, and the movement of the villagers to help | नापिकीमुळे शेतक-याची आत्महत्या, मदतीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन

नापिकीमुळे शेतक-याची आत्महत्या, मदतीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन

googlenewsNext


लाखनी (भंडारा) : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील दीक्षीत रूपचंद हजारे या ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने, रविवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. या दरम्यान मृत शेतक-याच्या कुटुंबीयांना १० लक्ष रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी रेंगेपारवासीयांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डीसले, नायब तहसीलदार व्ही. आर. थोरवे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. या वेळी मृताच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून १० हजारांची तत्काळ आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी डॉ. अजय तुमसरे, दिनेश गिरीपुंजे, बाळा शिवणकर, सुनील भांडारकर, सूरज पंचबुद्धे, मोहन निर्वाण यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Web Title:  The farmer's suicide due to napikis, and the movement of the villagers to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी