मुलीच्या साखरपुड्याआधीच शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:30 AM2017-12-01T04:30:04+5:302017-12-01T04:30:22+5:30
मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाºया कर्जबाजारी शेतकरी पित्याने तिच्या साखरपुड्याच्या एक दिवस आधीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आष्टा (ह.ना.) गावात बुधवारी रात्री घडली.
आष्टी (जि. बीड) : मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाºया कर्जबाजारी शेतकरी पित्याने तिच्या साखरपुड्याच्या एक दिवस आधीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आष्टा (ह.ना.) गावात बुधवारी रात्री घडली.
आष्टा (ह.ना.) येथील अंगद बाबासाहेब गळगटे (४७) या शेतकºयाने बँकेचे १ लाखाचे कर्ज घेतले होते. शासनाच्या कर्जमाफीच्या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन त्यांनी राहत्या घरीच पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळगटे यांच्या मुलीला पाहण्यासाठी चार दिवसांपूर्वीच पाहुणे आले होते. गुरुवारी मुलीचा साखरपुडा होणार होता. त्याआधीच त्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यात तवलवाडी येथील राजू गायकवाड या तरुण शेतकºयानेही शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
टाकरवणमध्ये आत्महत्या
माजलगाव तालुक्यातील टाकरवण तांडा येथील देवीदास राठोड या शेतकºयाने बॅँक व खासगी सावकाराच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने मंगळवारी विषप्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर दोन लाखांचे कर्ज होते, असे मुलगा रवी याने सांगितले.