शेततळयांचे गाव घाटा
By admin | Published: January 18, 2017 08:55 AM2017-01-18T08:55:49+5:302017-01-18T09:00:50+5:30
केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला.
नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १८ - वाशिम येथून जवळच असलेल्या दळणवळणाचा योग्य रस्ता नसलेल्या व केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला. शेततळ्याचा एवढा मोठा लाभ घेणारे जिल्हयातील हे एकमेव गाव ठरले आहे. येथील शेतकऱ्यांच्या पुढाकाराने इतरही गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आज येथील शेतकरी या शेततळयाच्या आधारावर विविध प्रकारची पीके घेऊन स्वावलंबी झाला आहे.
या कामासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी के.एस. गावधाने , उपविभागीय कृषी अधिकारी मुरली इंगळे, कृषी सहायक डी.के. रणवीर, बँक शाखा व्यवस्थापक बी.एस. जाधव, निरिक्षक के. एस. गायकवाड यांनी परिश्रम घेवून पाठपुरावा करुन मोलाचे मार्गदर्शन केले. या शेततळयांचय आधारावर शेतकऱ्यांनी मिरची, टमाटे व काकडी अशी लागवड केली. यामधून शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फायदा होत आहे. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून बरेच शेतकरी शेततळे घेण्यासाठी उत्सूक आहेत. घोटा गावामध्ये शेडनेटचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ७ शेतकरी अल्पभुधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे हे विशेष!
मागेल त्याला शेततळे योजनेचा फायदा
मागेल त्याला शेततळे योजनेचा घोटा या गावाने पुरेपुर फायदा केल्याने आज येथे शेतकऱ्यांच सिंचनाचा प्रश्न मिटत आहे. काही शेतकऱ्यांनी तर मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले आहे यामधून दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न घेणे सुरु केले आहे. योग्य नियोजन व कृषी विभागाचे सहकार्य तसेच बँकेने केलेल्या सहकायार्मुळे धोटा येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा फायदा घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे कार्य पाहता इतरही शेतकरी या योजनेच्या फायदयासाठी सरसावला आहे.
आकारानुसार शेततळयासाठी खर्च
घोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .
आकारानुसार शेततळयातून होणारे सिंचन
घोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .
कृषी विभागाच्या योजनेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने व इच्छेने हे शक्य झाले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्य करण्यात आले. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कायार्मुळे इतर शेतकरी आता पुढे येत आहेत.
- डी.के. रणवीर कृषी सहायक, घोटा