बिल थकित असणा-या शेतक-यांची वीज कापणार नाही: चंद्रशेखर बावनकुळे
By admin | Published: May 24, 2017 09:17 PM2017-05-24T21:17:56+5:302017-05-24T21:18:45+5:30
राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतक-यांकडून थकित वीजबिलाची वसूली सक्तीने करणार नाही. तसेच कोणत्याही शेतक-यांचे वीज कनेक्शन कापणार
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 - राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतक-यांकडून थकित वीजबिलाची वसूली सक्तीने करणार नाही. तसेच कोणत्याही शेतक-यांचे वीज कनेक्शन कापणार नसल्याची ग्वाही ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील शेतक-यांकडे २२ हजार कोटी रुपयांचे बिल थकित आहे. व्याज आणि दंड वजा करता १४ हजार कोटी रुपये होतात. शेतक-यांना वीज बील भरण्यासाठी पाच हप्ते पाडून देण्यात आले आहेत. प्रत्येक तीन महिन्यांनी त्यांनी हप्ता भरावा.अशा प्रकारे थकबाकी भरण्यासाठी १५ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
कोराडी आणि परळी येथील वीज निर्मिती संचातील बिघाडामुळे वीज निर्मितीवर फारसा फरक पडलेला नाही. राज्यातील खाजगी वीजनिर्मिती प्रकल्प अदानीकडून १२०० मेगावॅट आणि इंडियाबुल्सकडून ५०० मेगावॅट वीज मिळत आहे. महावितरणला मागील पंधरा दिवसात अडचण निर्माण झाली होती. पण ती आता ददूर करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.