महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:28 PM2019-05-23T18:28:54+5:302019-05-23T18:29:28+5:30

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखलं आहे.

The farmers who called themselves the leaders of the farmers were defeated - Sadabhau Khot | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला- सदाभाऊ खोत

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला- सदाभाऊ खोत

Next

कोल्हापूरः हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखलं आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यानंतर आता शेट्टीच्या या पराभवावर त्यांचे एकेकाळचे साथीदार आणि सध्याचे विरोधक सदाभाऊ खोत यांनी जहरी टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, हा शेतकरी चळवळीचा विजय आहे. स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांचा शेतकऱ्यांनीच पराभव केला आणि गर्वहरण केले आहे. शेतकरी चळवळीचा झेंडा हातात घेऊन बळीराजाचे प्रश्न मांडत राहू, असा विश्वासही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.
 
दहा वर्षांपूर्वी शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा पराभव केला होता. धैर्यशील यांनी दहा वर्षांनंतर या पराभवचा बदला घेत शेट्टींना अस्मान दाखवलं. निवेदिता माने 1999 आणि 2004 मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामुळे 2009मध्ये निवेदिता माने हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र राजू शेट्टींनी त्यांचा जवळपास 95 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली.


राजू शेट्टींनी 2009 पाठोपाठ 2014 मध्येही विजय मिळवत दिल्ली गाठली. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या कल्लाप्पा आवडेंचा पावणे दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे यंदा राजू शेट्टींना यंदा हॅट्रिकची संधी होती. मात्र निवेदिता मानेंचे चिरंजीव धैर्यशील यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभं केलं. सध्या त्यांच्याकडे जवळपास 1 लाख मतांची आघाडी आहे. त्यामुळे माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. 
 

Web Title: The farmers who called themselves the leaders of the farmers were defeated - Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.