शेतक-यांची दिवाळी होणार गोड - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:42 AM2017-10-08T00:42:08+5:302017-10-08T00:42:25+5:30
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.
जळगाव : राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात कोणावरही अन्याय होऊ नये याची काळजी घेतली जात असून पैसे मिळण्यास थोडा विलंब होत असला तरी दिवाळीपर्यंत पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात दीड लाख रुपये जमा होऊन शेतक-यांची दिवाळी गोड होईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.
जैन इरिगेशन सिस्टीम लि. प्रस्तुत ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी येथे झाला. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. खान्देशातील २५ शेतकºयांना ‘लोकमत कृषीरत्न’ पुरस्कारने गौरविण्यात आले.
‘नदीजोड’चे लवकरच मोठे काम
गिरीश महाजन म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यात दरवर्षी कोठे फारच कमी तर कोठे खूपच जास्त पाऊस होतो. त्यामुळे सरकारकडून नदीजोड प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले जात आहे. नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा मंत्रिपद आल्याने महाराष्ट्राची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. राज्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळणार असून दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर हे काम झालेले असेल. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मोठी मदत होईल.
५ लाख सौरपंप शासन देणार
वीज प्रश्नावर मात करण्यास शासन शेतकºयांना ५ लाख सौरउर्जा पंपांचे वितरण करणार आहे. सर्व फिडरही सौर उर्जेने जोडण्यात येणार आहेत. शेतकºयांना सौर पंपासाठी अनुदान दिले जाते. जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. पाटाच्या पाण्यावरही वीज निर्मितीचे धोरण असून शासनाचे शाश्वत शेतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी सांगितले.