शेतकऱ्यांना देशोधडीला लावू देणार नाही

By Admin | Published: May 26, 2017 03:47 AM2017-05-26T03:47:13+5:302017-05-26T03:47:13+5:30

शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत खोटी आश्वासने देणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावू. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही

Farmers will not be allowed to be ransacked | शेतकऱ्यांना देशोधडीला लावू देणार नाही

शेतकऱ्यांना देशोधडीला लावू देणार नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा (पुणे) : शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत खोटी आश्वासने देणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावू. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. राज्यात जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल, तेथे तिथे आम्ही लढा उभारणार आहोत, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.
खासदार शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रेचे गुरुवारी लोणावळा शहरात आगमन झाले. सकाळी साडेआठला शेट्टी यांनी मुंबईकडे पायी प्रवास सुरूकेला. लोणावळ्यात पोहोचल्यावर नागरिकांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, की निवडणुकीच्या काळात मोदी व भाजपाने दिलेल्या आश्वासनाला आम्हीही बळी पडलो. मात्र, याची जाणीव झाल्यामुळेच ही आत्मक्लेश यात्रा काढली आहे. मागील वर्षभरात राज्यभरातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज जमा केले असून, येत्या ३० मे रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे देण्यात येणार आहेत.

Web Title: Farmers will not be allowed to be ransacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.