पंतप्रधानांच्या वाहनांवर शेतकरी कांदे फेकतील म्हणून बाजारातच येऊ दिले नाहीत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:15 AM2019-09-20T05:15:52+5:302019-09-20T05:16:18+5:30

शेतकरी संकटात असताना बाजारात कांदा आणायचा नाही असे नाशिकच्या शेतकऱ्यांना सांगितले गेले़

Farmers will not be allowed to come on the market as they will throw onions on PM's vehicles - Sharad Pawar | पंतप्रधानांच्या वाहनांवर शेतकरी कांदे फेकतील म्हणून बाजारातच येऊ दिले नाहीत - शरद पवार

पंतप्रधानांच्या वाहनांवर शेतकरी कांदे फेकतील म्हणून बाजारातच येऊ दिले नाहीत - शरद पवार

Next

नांदेड/परभणी/हिंगोली : शेतकरी संकटात असताना बाजारात कांदा आणायचा नाही असे नाशिकच्या शेतकऱ्यांना सांगितले गेले़ शेतकऱ्यांची एवढी भीती त्यांना का वाटावी? कांद्याचे भाव कोसळल्याने येथील शेतकरी पंतप्रधानांच्या वाहनावर कांदे फेकतील म्हणून असे आदेश काढल्याचे तेथील सुरक्षा अधिकाºयांनी सांगितले़, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी गुरुवारी मराठवाड्यात केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी नाशिकमध्ये आहेत़ पाहुण्यांचे स्वागत करायचे ही महाराष्ट्राची परंपरा आहे़ मात्र नाशिकमध्ये आज सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना पोलिसांनी नोटीस बजावून घराबाहेर न पडण्याची तंबी दिली. इतकेच नव्हे तर मागील चार दिवसांपासून काद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्रीही बंद ठेवली आहे़ मोदी यांच्या दौºयात कांदा फेक होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली.
भाजप सरकार आता पर्यटनाच्या नावाखाली गड किल्ल्यांवर छमछमची व्यवस्था करून देत आहे़ ज्या किल्ल्यांवर कधी समशेर तलवारींचे नाद व्हायचे तिथे आता सरकार सर्वकाही सुविधा देण्यासाठी सज्ज झाली आहे़ बारामतीतील चौफुलाचा उल्लेख करताना नांदेडमध्ये भोकर फाट्यावरही आता छमछमची भानगड सुरू होईल, असेही ते म्हणाले़
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनविण्याचे आश्वासन दिले़ प्रधानमंत्र्यांना बोलावून आज तीन वर्षे झाली़ तिथं काहीही झालेलं नाही़ वाटलं तर बघा जाऊन, समुद्रात काही दिसतंय का? नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि धंदा फसवणुकीचा करायचा, असा प्रकार या लबाड राजकर्त्यांनी सुरू केला आहे, असे ते म्हणाले.
>‘किती उद्योग बंद पडले हे जाहीर करावे’
देशात आणि राज्यात सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असून कारखाने बंद पडत आहेत. शेतीमालाला भाव नाही, दरडोई उत्पन्नात घसरण होत आहे़ अशाही परिस्थितीत राज्यात नवे उद्योग येत असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत़ मुख्यमंत्र्यांनी राज्यातील किती कारखाने बंद पडले याची संख्या सांगावी, असे आव्हान शरद पवार यांनी दिले़

Web Title: Farmers will not be allowed to come on the market as they will throw onions on PM's vehicles - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.