1 जूनपासून शेतकरी जाणार संपावर

By admin | Published: May 22, 2017 05:09 PM2017-05-22T17:09:11+5:302017-05-22T17:14:56+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनभावना तीव्र असतानाही शासनाने घेतलेली चालढकल करण्याची भूमिका, कर्जमाफीचा प्रश्न, शेतमालाला

Farmers will stop the strike from June 1 | 1 जूनपासून शेतकरी जाणार संपावर

1 जूनपासून शेतकरी जाणार संपावर

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 22 - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनभावना तीव्र असतानाही शासनाने घेतलेली चालढकल करण्याची भूमिका, कर्जमाफीचा प्रश्न, शेतमालाला  मिळत नसलेला हमीभाव यामुळे संतप्त सलेल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार येत्या 1 जूनपासून  शेतकरी संपावर जाणार आहेत.
 
 आज अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. संपावर गेल्यानंतर शेतकरी आपल्याकडील कोणत्याही शेतमालाची विक्री करणार नाहीत, असे यावेळी ठरवण्यात आले. तसेच शहरांकडे जाणारा दूध आणि भाजीपाला रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, कर्जमुक्तीसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच, असा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी  रविवारी केला होता.  शेतकरी संपाबाबत घनवट यांनी काल नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी  ते म्हणाले, संप यशस्वी करण्यासाठी रस्ते अडवणार, भाजीपाला बाजारपेठेत जाऊ देणार नाही, दूधाचे टँकर अडवणार आहे़ सरकार कर्जमुक्तीच्या किंवा शेतकरी उन्नतीच्या ठोस उपाययोजना सांगत नाही. शेती उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. पण सध्या वाढलेल्या उत्पदनालाच चांगला मिळत नाही़ त्यामुळे सध्याच्या शेतमालाला चांगला मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत.
 
(  १ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच )
 
 
दहा वर्षे कर्जाची वसुली करू नका, दहा वर्षानंतर शेतकरी मुद्दलची परतफेड करील़ आयात-निर्यातवरील बंधने उठवावीत, मार्केट उपल्बध करुन द्यावे, तंत्रज्ञान आणि व्यापाराचे स्वातंत्र द्यावे, शेतमाल नासू नये, यासाठी सुविधा द्याव्यात, शेतमाल प्रक्रिया उद्योगावरील बंधने हटवावीत, आदी मागण्या घनवट यांनी केल्या होत्या. 
 

Web Title: Farmers will stop the strike from June 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.