शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार
By admin | Published: April 2, 2016 01:23 AM2016-04-02T01:23:25+5:302016-04-02T01:23:25+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास होऊ नये, यासाठी आंदोलने आणि मोर्चादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे
मुंबई : दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास होऊ नये, यासाठी आंदोलने आणि मोर्चादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
राहुल मोटे आणि बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असूनही त्याची अवस्था आधीच दयनीय झाली असताना आपल्या मागण्यांसाठी त्याने आंदोलन केले तर तो गुन्हा ठरू नये, अशी मागणी कडू आणि मोटे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची ही व्यथा बरोबर असून, त्यांच्यावर दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मी ओव्हरटाइम गृहमंत्री!
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे माझे पूर्ण लक्ष आहे. मी फूलटाइम नव्हे; तर ओव्हरटाइम गृहमंत्री आहे, असे फडणवीस म्हणाले.
पोलिसांना निवृत्तीनंतर स्वत:चे घर नसते. हे लक्षात घेऊन पुढील तीन वर्षांत सर्व पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या १२ हजार घरे पोलिसांसाठी बांधून तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.