नोकरीपेक्षा शेतीचं भारी..! कमी शेतीजमीन असेल तरी चिंता नको, ‘हे’ पीक घ्या अन् लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:26 AM2022-07-15T10:26:01+5:302022-07-15T10:27:07+5:30

शेती व्यवसाय अनिश्चिततेवर आधारित असल्यामुळे आणि दुष्काळी परिस्थितीत काळानुरुप वाढ होत गेल्यानं तरुण शेतीपासून दुरावत गेला.

farming business idea start ice apple farming and earn millions | नोकरीपेक्षा शेतीचं भारी..! कमी शेतीजमीन असेल तरी चिंता नको, ‘हे’ पीक घ्या अन् लाखोंची कमाई

नोकरीपेक्षा शेतीचं भारी..! कमी शेतीजमीन असेल तरी चिंता नको, ‘हे’ पीक घ्या अन् लाखोंची कमाई

googlenewsNext

शेती व्यवसाय अनिश्चिततेवर आधारित असल्यामुळे आणि दुष्काळी परिस्थितीत काळानुरुप वाढ होत गेल्यानं तरुण शेतीपासून दुरावत गेला. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत तोटा अधिक होत असल्यामुळे नवतरुण युवक शेतीपेक्षा नोकरी बरी म्हणत शहराकडे वळला. पण शेतीचं योग्य ज्ञान आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कमीत कमी जमिनीतही यशस्वीरित्या शेती करता येऊ शकते. यासाठी फक्त योग्य अभ्यास आणि ज्ञानाची गरज असते. 

शेतीच्या बाबतीत काळाच्या ओघात शेतीत बदल केला आणि बाजारपेठेची मागणी ओळखून व्हिजन ठेवलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. अगदी कमी शेत जमीन असेल तरी लाखोंची कमाई करता येऊ शकते. पीक पद्धतीत बदल करुन अल्पभूधारक शेतकरी देखील लाखो रुपये कमावू शकतात. अशीच एक शेती आहे ते म्हणजे आइस अ‍ॅपल म्हणजेच ताडगोळ्याची शेती. उन्हाचा तडाखा घालवण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला ताडगोळ्याचा आस्वाद घेताना तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. ताडगोळाची झाडे नारळासारखी दिसतात आणि प्रामुख्याने कोकण, गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात आढळतात.

मे-जूनच्या उष्णतेमुळे होणारी जळजळ, थकवा आणि निर्जलीकरण यापासून संरक्षण करण्यात ताडगोळा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या वर्षी ताडगोळ्याचा खप भरपूर होता, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले आणि नफा मिळविण्याचा नवा मार्ग मिळाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि ओडिसाच्या बहुतांश भागात ताडगोळा पिकवून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकरी ताडगोळा पिकवतात आणि स्वतः विकतात.

सुमारे दोन ताडाच्या झाडांवर ५०० हून अधिक ताडगोळे गोळा केले जातात. झाडावर चढून ताडगोळा तोडण्यासाठी मजुरांना २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मजुरीचाही जास्त खर्च येत नाही. ताडगोळ्याला यंदा बाजारात चांगली मागणी देखील होती. ताडगोळ्याच्या शेतीसाठी फक्त योग्य साधनसामग्री आणि मजूर असणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या काळात ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. 

Web Title: farming business idea start ice apple farming and earn millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.