‘दलित अत्याचार रोखण्यासाठी जलदगती न्यायालय’

By admin | Published: May 25, 2017 02:05 AM2017-05-25T02:05:59+5:302017-05-25T02:05:59+5:30

ज्या जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे अशा जिल्ह्यात ते रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियुक्त करणार आहे.

'Fast track court to stop Dalit oppression' | ‘दलित अत्याचार रोखण्यासाठी जलदगती न्यायालय’

‘दलित अत्याचार रोखण्यासाठी जलदगती न्यायालय’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : ज्या जिल्ह्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे अशा जिल्ह्यात ते रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियुक्त करणार आहे. त्यामुळे अत्याचार रोखण्याचा प्रयत्न केला जार्ईल. तसेच दलितांवरील अत्याचाराच्या केसेस जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. आठवले गटाने गुणिजनांचा सत्कार समारंभ पालघर येथे आयोजित केला होता. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नेमण्याबरोबरच पालघर जिल्हानिर्मिती होऊन ३ वर्षे झाली तरी अद्याप जिल्हा मुख्यालय झाले नाही ते येत्या २ वर्षांत ते पूर्ण करणार आहे. पालघरचे पाणी वसईला नेणे गैर असल्याचे सांगून त्यांनी वसई विरार भार्इंदरला पाणी देण्यासाठी स्वतंत्र पर्याय शोधायला हवा, असे स्पष्ट केले. पालघरमध्ये दलित आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी भाजपाचे खासदार चिंतामण वनगा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, सुरेश बारशिंग, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, अभिनेता टायगर श्रॉफ, राम तायडे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Fast track court to stop Dalit oppression'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.